जेव्हा पार्थ अर्जुनाने जगत्पती भगवान श्रीकृष्णाला जाजनगर बद्दल प्रश्न केला तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे देतात...
“पार्थ बाणी सुणि प्रभु चक्रपाणि बोलन्ति सुणो है
बिर जाजनग्र कथा कहिबा गोगले नसरी हेबो पार।“
अर्थात –
हे पार्थ जाजनगर बद्दल जे काही बोलले जाते ते कमी आहे, जाजनगरची महिमा चे वर्णन करणे शक्य नाही, होय, हे नक्की जाणून घ्या, कलियुगाच्या शेवटी जेव्हा मी कल्किच्या रूपात अवतरेन, तेव्हा माझ्या नेत्तृत्व खाली सुधर्मा सभा बसेल.
द्वापरयुगात जेव्हा धर्मसंस्थापनेचे कार्य संपले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अशा प्रकारे बिरजा क्षेत्रात जाण्याचा आदेश दिला...
श्रीमदबैतरणी तटे, कचिल्यता पार्वती।
अर्थात –
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, बैतरणी (जुनी गंगा) च्या तीरावर जिथे माँ बेद, विप्रा, वराह, बिरजा, बैतरणी बसल्या आहेत, तुम्हा सर्व पांडवगण त्या पवित्र स्थानावर तीर्थ यात्रा करून या.
यावर महापुरुष अच्युतानंद दासजी मलिकामध्ये अशा प्रकारे लिहितात...
भारतर पुण्य पीठ
ओड़राष्ट्रभुंइ तामध्यरे
प्रभु ऐतेकथा जेबे हुईं।
अर्थात –
भारताच्या सर्व पिठांपैकी जाजनगर, एक पुण्य भूमीआहे, एक पवित्र स्थान आहे, एक पवित्र तीर्थ क्षेत्र आहे , त्या ठिकाणी, कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या प्रारंभी, अनेक रहस्ये उघड होतील, अनेक दैवी गोष्टी सर्वांसमोर येतील.
महापुरुष पुन्हा अशा प्रकारे उत्तर देतात...
जाजनग्र बोलीजिबे बैतरणी तीरे,
ब्रह्मा शुभस्तंभ स्थापिथिले पूर्बरे।
अर्थात –
जाजनगर मध्ये ज्या ठिकाणी बैतरणी नदी आहे, त्याच काठावर एका दिव्य ठिकाणी ब्रह्माजींनी स्वतः शुभ स्तंभाची स्थापना केली होती, ब्रह्माजी आणि बैतरणी (जुनी गंगा) यांनी स्थापन केलेला शुभ स्तंभ आणि मां बिरजा किंवा वराह नारायण किंवा त्रिवेणी धार हे सर्व जाजनगर मध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम ब्रह्माजींनी त्या ठिकाणी यज्ञविधी केला तेव्हा माता गंगा पृथ्वीवर अवतरली.
"जय जगन्नाथ"

